एच डी एफ सी मध्ये करिअर

Video Image

ही संस्था चालविणारे लोक एच डी एफ सी च्या हृदयस्थानी आहेत. कामाच्या सकारात्मक वातावरणामध्ये पुरेसे ट्रेनिंग देऊन त्यांच्या करिअर विकासावर लक्ष केंद्रित करून त्यांना सतत विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अत्यंत अभिमानाने, आम्हाला हे सांगण्यात आनंद होत आहे की एच डी एफ सी कडे व्यावसायिकांची उच्च प्रेरणादायी टीम आहे आणि इंडस्ट्रीमधील सर्वात कमी कर्मचारी टर्नओव्हर रेट आहे.

जर तुम्ही स्वतःचे तत्त्व असलेले तरुण, प्रतिभावान व्यक्ती असाल आणि आव्हानांचा आनंद घेता, ज्याला सर्वोत्कृष्ट बनण्याची उत्कटता आहे आणि आमच्या संस्थेच्या संस्कृतीत बसू शकता, तर तुम्ही एच डी एफ सी च्या विस्तार यात्रेचा भाग बनू शकता.

एच डी एफ सी लाच प्राधान्य का?

देशातील अग्रणी हाऊसिंग फायनान्स संस्था

मागील 41 वर्षांपासून सातत्यपूर्ण उच्च वाढीचा दर ज्यामुळे तरुण व्यावसायिकांना कंपनीसह प्रगती करण्यासाठी भरपूर शिकण्याची संधी उपलब्ध झाल्या

मुक्त आणि अनौपचारिक संस्कृती जेथे आम्ही अखंडता, बांधिलकी, संघभावना आणि कस्टमर सर्व्हिस मध्ये उत्कृष्टता यांना किंमत देतो.

'प्रत्यक्ष कार्यातून शिक्षण'या तत्त्वज्ञाना मुळे निर्णय घेण्याबरोबरच कौशल्य उभारणीस प्रोत्साहन मिळते. आमच्या कर्मचाऱ्यांचे 'दीर्घकालीन संपत्तीची निर्मिती' यावर लक्ष केंद्रित आहे.

वर्तमान रिक्त पदे

वर्तमान रिक्त पदे

14 रिझल्ट्स
कोट्टयम
टेक्निकल अप्रेझर- कोट्टयम/मुवाट्टुपुळा
आवश्यक अनुभव: 2+ वर्षांचा अनुभव अतिरिक्त फायदा असेल
शिक्षण: B Tech /BE (सिव्हिल इंजिनीअरिंग)

कामाचे स्वरूप

तांत्रिक

1 मूल्यांकन – जमीन व बिल्डिंगच्या लोनसाठी सिक्युरिटी म्हणून देऊ केलेल्या प्रॉपर्टीच्या बाजार मूल्याचे मूल्यांकन.
2 साईट भेटी - मूल्यांकन करण्यासाठी आणि कामाच्या प्रगतीची माहिती घेण्यासाठी प्रॉपर्टीला भेट देणे.
3 डॉक्युमेंटेशन - लागू बिल्डिंग नियम आणि इतर लागू नियमांचे अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी बिल्डिंग मंजुरी, प्लॅन्स, अंदाजे किंमत इ. सारख्या डॉक्युमेंट्सची पडताळणी.
4 डॉक्युमेंट्स आणि साईट निरीक्षणांवर आधारित मूल्यांकनावर आधारित साईट निरीक्षणे आणि लोन शिफारस करणे.
5 रिलेशनशिप मॅनेजमेंट - चॅनेल पार्टनरसह कस्टमरसह.
6 पात्रता - फ्रेश / अनुभवी B Tech /BE (सिव्हिल इंजिनीअरिंग) ज्यांचा शैक्षणिक रेकॉर्ड (किमान 60% गुण) चांगला व सातत्यपूर्ण आहे आणि इंग्रजी आणि मल्याळम भाषेमध्ये चांगले संवाद कौशल्य आहे.
7 लोकेशन – कोट्टयम/मुवाट्टुपुळा

इच्छित उमेदवार प्रोफाईल

कोची
ऑपरेशन्स (क्रेडिट प्रोसेसिंग)
आवश्यक अनुभव: 2+ वर्षांचा अनुभव अतिरिक्त फायदा असेल
शिक्षण: ग्रॅज्युएट, M Com, CA किंवा MBA

कामाचे स्वरूप

ऑपरेशन्स (क्रेडिट प्रोसेसिंग)

1 मूल्यांकन - गुणवत्ता पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी प्रभावी क्रेडिट मूल्यांकन, वेळमर्यादा राखणे, चॅनेल पार्टनर सह चांगले संबंध राखणे आणि प्रोसेस थिंकर व इनोव्हेटर बनणे अशा पद्धतीने जोखीम व्यवस्थापित करणे.
2 डॉक्युमेंट्स कलेक्ट करणे आणि तपासणे (उदा. क्रेडिट, लोन करार, ॲप्लिकेशन फॉर्म, गॅरंटी फॉर्म्स) (कायदेशीर परिणाम).
3 फोनवर कस्टमर सोबत संवाद साधणे. यामध्ये कस्टमरच्या आक्षेपांचे व्यवस्थापन देखील समाविष्ट आहे. कस्टमरना भेटणे आणि वैयक्तिक चर्चा करणे. कस्टमरच्या गरजांसाठी योग्य उपाययोजना सूचवणे.
4 वार्तालाप कौशल्य - कस्टमरच्या गरजा समजून घेणे, आक्षेप व्यवस्थापित करणे आणि उपायांची रचना, समाप्ती याविषयी माहिती घेणे.
पात्रता - फ्रेश/अनुभवी B Com ग्रॅज्युएट्स, M Com, CA किंवा MBA ज्यांचा शैक्षणिक रेकॉर्ड (किमान 60% गुण) चांगला व सातत्यपूर्ण आहे आणि इंग्रजी आणि मल्याळम भाषेमध्ये चांगले संवाद कौशल्य आहे.

लोकेशन - कोची

इच्छित उमेदवार प्रोफाईल

कन्नूर
बिझनेस डेव्हलपमेंट - कालिकत/कन्नूर
आवश्यक अनुभव: 2+ वर्षांचा अनुभव अतिरिक्त फायदा असेल
शिक्षण: ग्रॅज्युएट्स/पोस्ट ग्रॅज्युएट्स किंवा MBA

कामाचे स्वरूप

बिझनेस डेव्हलपमेंट

1 डेव्हलपर्स, डेव्हलपमेंट अथॉरिटीज, कॉर्पोरेट्स सोबत बिझनेस संबंध व्यवस्थापित करणे.
2 वरील संस्थांसह टाय-अप आणि इव्हेंटद्वारे प्रॉडक्ट्सना प्रमोट करणे.
3 बाजारपेठेचे विश्लेषण, बिझनेस धोरणांची शिफारस करणे.
4 बिझनेस सोर्स मॅपिंगद्वारे सेल्स फोर्सला सपोर्ट करा.
5 ट्रेनिंग आणि स्पर्धांद्वारे सेल्स फोर्स प्रेरित करणे.
6 कॉल सेंटर आणि वेब आधारित उपक्रमांचे समन्वय साधणे.
7 पात्रता - फ्रेश/अनुभवी ग्रॅज्युएट्स/पोस्ट ग्रॅज्युएट्स किंवा MBA ज्यांचा शैक्षणिक रेकॉर्ड (किमान 60% गुण) चांगला व सातत्यपूर्ण आहे आणि इंग्रजी आणि मल्याळम भाषेमध्ये चांगले संवाद कौशल्य आहे.
8 लोकेशन – कालिकत/कन्नूर.

इच्छित उमेदवार प्रोफाईल

त्रिचूर
ऑपरेशन्स (फ्रंट ऑफिस) - त्रिशूर/कालिकत
आवश्यक अनुभव: 2+ वर्षांचा अनुभव अतिरिक्त फायदा असेल
शिक्षण: ग्रॅज्युएट्स/पोस्ट ग्रॅज्युएट्स किंवा MBA

कामाचे स्वरूप

ऑपरेशन्स (फ्रंट ऑफिस)
1 मूल्यांकन - भविष्यात लोन परतफेड करण्यासाठी क्रेडिट पात्रता आणि कस्टमरची क्षमता मूल्यांकन करणे.
2 संवाद आणि लोन सल्ला-बैठक आणि कस्टमरशी संवाद.
3 डॉक्युमेंटेशन - डॉक्युमेंट्स कलेक्ट करणे आणि तपासणे.
4 लोन प्रक्रिया/वितरण प्रक्रिया.
5 क्रॉस-सेलिंग-क्रॉस- ग्रुप कंपनी प्रॉडक्ट्सचे क्रॉस सेलिंग.
6 रिलेशनशिप मॅनेजमेंट - चॅनेल पार्टनरसह कस्टमरसह.
पात्रता - फ्रेश/अनुभवी ग्रॅज्युएट्स/पोस्ट ग्रॅज्युएट्स किंवा MBA ज्यांचा शैक्षणिक रेकॉर्ड (किमान 60% गुण) चांगला व सातत्यपूर्ण आहे आणि इंग्रजी आणि मल्याळम भाषेमध्ये चांगले संवाद कौशल्य आहे.
लोकेशन - त्रिशूर/कालिकत 

इच्छित उमेदवार प्रोफाईल

मार्तंडम
टेक्निकल अप्रेझर- मार्तंडम, तमिळनाडू
आवश्यक अनुभव: 2+ वर्षांचा अनुभव अतिरिक्त फायदा असेल
शिक्षण: B.Tech/M. Tech- सिव्हिल

कामाचे स्वरूप

नोकरीची जबाबदारी

 प्रॉपर्टीजचे तांत्रिक मूल्यांकन/अंदाज.
 प्रॉपर्टीचे मूल्यांकन करण्यासाठी विविध तांत्रिक/महसूल डॉक्युमेंट्सची पडताळणी.
 कस्टमरला भेटणे आणि वैयक्तिक चर्चा करणे
 विस्तृतपणे प्रवास करण्याची इच्छा
 चांगले संवाद कौशल्य, इंग्रजी आणि मल्याळममध्ये सादरीकरण कौशल्य.
 बिझनेस सोर्स मॅपिंग आणि सोर्स वाईज परफॉर्मन्स मापन द्वारे सेल्स फोर्सला सपोर्ट करा.
 टीम म्हणून काम करा आणि टीम म्हणून योगदान द्या, केवळ वैयक्तिक प्रतिभेवरच लक्ष केंद्रित करू नका.
 आक्रमकता/अनुकूलता/लवचिकता/स्पर्धात्मक धोरण मूल्यांच्या संदर्भात

लोकेशन: मार्तंडम, तमिळनाडू
पात्रता: B.Tech/M. Tech- सिव्हिल
रिमार्क्स: 2+ वर्षांचा अनुभव अतिरिक्त फायदा असेल.

इच्छित उमेदवार प्रोफाईल

मुंबई
मॅनेजर ऑडिट आणि रेग्युलेटरी कम्प्लायन्स – क्रेडिट रिस्क
आवश्यक अनुभव: 10 ते 15 वर्षे
शिक्षण: चार्टर्ड अकाउंटंट

कामाचे स्वरूप

मॅनेजर ऑडिट आणि रेग्युलेटरी कम्प्लायन्स – क्रेडिट रिस्क साठी प्रोफाईल

पात्रता: चार्टर्ड अकाउंटंट  

कामाचा अनुभव: IFRS 9 अंतर्गत कोणत्याही फायनान्शियल संस्था/बँक हाताळणी ECL संबंधित प्रकरणांच्या क्रेडिट रिस्क फंक्शन मध्ये काम करण्याचा 10 ते 15 वर्षांचा अनुभव, NHB/RBI ला रेग्युलेटरी रिपोर्टिंग आणि ऑडिटर/रेग्युलेटर हाताळणे.

कामाचे स्वरूप:

  • इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड (IndAS) अंतर्गत संग्रहणीयता, लोन नुकसान आणि नुकसानामुळे डिफॉल्टचा अंदाज घेण्यासाठी मॉडेल्स आणि टूल्स विकसित करण्यास मदत करणे
  • NPA गणना/ तरतूद आणि रेग्युलेटरी रिपोर्टिंग मध्ये असाईनमेंट हाताळणे.
  • RBI/NHB परिपत्रकांचे स्पष्टीकरण आणि रेग्युलेटरी रिपोर्ट्सवर काम करणे.
  • इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड 109 नुसार अपेक्षित क्रेडिट नुकसान, नुकसानामुळे डिफॉल्ट आणि डिफॉल्टची संभाव्यता याच्या गणनेसाठी मॉड्यूल्स विकसित करून सिस्टीम ऑटोमेशनसाठी आयटी टीमसह समन्वय
  • विविध अंतर्गत नियंत्रण आणि टेस्टिंग ऑडिटसाठी अंतर्गत विभाग आणि अंतर्गत ऑडिटर्समध्ये समन्वय.

लोकेशन: मुंबई

इच्छित उमेदवार प्रोफाईल

पुणे
लोन मूल्यांकन कर्ता-सीए-रिटेल लेंडिंग,पुणे
आवश्यक अनुभव: 1-5
शिक्षण: CA

कामाचे स्वरूप

- स्वयंरोजगारित व्यक्ती/नोकरदार कस्टमरच्या पत योग्यतेचे मूल्यांकन.
- लोन प्रस्ताव आणि लोन सेवा आवश्यकते विषयी कस्टमरशी संवाद.
- कस्टमरशी चर्चा आणि वैयक्तिक चर्चा. कस्टमरच्या गरजांच्या अनुरुप पर्याप्त उपाय सुचविणे.
- व्यावसायिक गाठीभेटी आणि पडताळणी.
- कागदपत्रांचे संकलन आणि पडताळणी.
- मंजूरीसाठी प्रस्तावाची शिफारस करणे.
- नवीन आणि व्यवसायाचे उन्नत स्त्रोत बनविण्याच्या मार्गांचे प्लॅनिंग आणि अंमलबजावणी.

इच्छित उमेदवार प्रोफाईल

उपरोक्त पदासाठी उच्च ऊर्जा स्तर, प्रामाणिकपणा, कस्टमर अभिमुखता, उत्कृष्ट संवाद कौशल्य (मौखिक आणि लिखित), खात्री पटवून देण्याचे कौशल्य, प्रोसेस अभिमुखता, समय व्यवस्थापन, संघ भावना कौशल्य आणि परिणाम प्राप्त करण्यासाठी दृढ संकल्प आवश्यक आहे.

पटना
क्रेडिट मूल्यमापन-किरकोळ लोन-पाटणा
आवश्यक अनुभव: 7-8
शिक्षण: CA

कामाचे स्वरूप

रोजगारित कस्टमर्सच्या क्रेडिट पात्रतेचे मूल्यमापन करणे
लोन मूल्यमापन आणि लोन सेवा आवश्यकतांच्या संबंधात फोनवर कस्टमर संवाद
क्रेडिट डॉक्युमेंट्सचे अवलोकन आणि विश्लेषण
मंजुरीसाठी लोनची शिफारस
चॅनेल पार्टनर सह समन्वय
विभागांतर्गत समन्वय.

इच्छित उमेदवार प्रोफाईल

उपरोक्त पदासाठी उच्च ऊर्जा स्तर, प्रामाणिकपणा, कस्टमर अभिमुखता, उत्कृष्ट संवाद कौशल्य (मौखिक आणि लिखित), खात्री पटवून देण्याचे कौशल्य, प्रोसेस अभिमुखता, समय व्यवस्थापन, संघ भावना कौशल्य आणि परिणाम प्राप्त करण्यासाठी दृढ संकल्प आवश्यक आहे.

दिल्ली
कायदेशीर मूल्यांकन कर्ता- दिल्ली
आवश्यक अनुभव: 2-4
शिक्षण: LL.B

कामाचे स्वरूप

नोकरीचे वर्णन-- प्रकल्प फाईल्सचे मूल्यांकन (प्रॉपर्टी कायद्याच्या अद्ययावत ज्ञानासह), वैयक्तिक लोन्स संबंधित निर्दिष्टित कागदपत्रांचे मूल्यांकन. - प्रॉपर्टी, तारण निर्मिती आणि मालकी हक्क पडताळणीच्या संदर्भात रिटेल कर्जाच्या समस्यांवर कायदेशीर सल्ला प्रदान करणे. - पालन ​​समस्यांची हाताळणी. बिल्डर सह विविध कर्ज करार संबंधी मसुदा निर्मिती आणि संरचना- रिटेल लोन कराराची मसुदा निर्मिती आणि कायदेशीर नोटीसला प्रतिसाद. कामाच्या स्वरुपामध्ये तारण अंतर्गत प्रॉपर्टी संबंधित कायदेशीर कागदपत्रांचे प्रमाणपत्र, तृतीय पक्षाच्या वकिलांनी जारी केलेल्या कागदपत्रांची पाहणी, प्रॉपर्टी मालकाशी चर्चा आणि विचारविनिमय आणि कायदेशीर कागदपत्रांची पडताळणी आणि प्रॉपर्टी कायद्याअंतर्गत असलेल्या निवासी आणि कायदेशीर प्रॉपर्टीचे स्थानिक आणि केंद्रीय कायद्यांना अनुसरुन संपादना बाबत क्लायंटला मार्गदर्शन, मसुदा निर्मिती जसे की संमती आणि परवाना करार/कर्मचारी करार, करार/सेवा करार, अभिज्ञापन, घोषणापत्र, अधिस्वीकृती, विश्वास आणि सुरक्षा नुकसान भरपाई बंधपत्र, तारण करार, हस्तांतरण करार, हमीपत्र इ. संस्थेच्या वतीने कायदेशीर नोटीस, क्लायंट तक्रारी, वैधानिक संस्था यांसाठी मसुदा निर्मिती करणे;

इच्छित उमेदवार प्रोफाईल

इच्छित उमेदवाराची प्रोफाईल- प्रॉपर्टी कायदा हस्तांतरण संबंधित विविध तरतुदींचे ज्ञान, भारतीय कंपनी कायदा, SARFAESI कायदा, भारतीय नियमन कायदा, भारतीय मुद्रांक कायदा, RERA कायदा आणि अन्य स्थानिक लागू कायदे; उमेदवाराला प्रॉपर्टी कायदा, व्यावसायिक कायदे, कॉर्पोरेट कायदे यांचे समर्पक ज्ञान आणि विविध कायदेशीर कागदपत्रांच्या मसूदा निर्मितीचा अनुभव असावा.. उमेदवाराचे इंग्रजीवर(भाषिक आणि लिखित) प्रभुत्व असावे आणि स्थानिक भाषेतून (तमिळ)वाचन करण्यास सक्षम हवा. उमेदवाराकडे संयम आणि सहानुभूतीसह प्रॉपर्टीच्या व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर कागदपत्रांबद्दल सर्वसामान्यांना स्पष्टीकरण आणि मार्गदर्शन करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे आणि त्या/ तिचे कायदेशीर ज्ञान व्यवसायाच्या वाढीस प्रोत्साहित करणारे असल्याची सुनिश्चिती करावी. आम्हाला स्वयं-प्रेरित, आंतरवैयक्तिक/सांघिक क्षमता कौशल्य असलेला आणि कस्टमर सर्व्हिस सोबत बांधिलकी जपणाऱ्या उमेदवाराची आवश्यकता आहे.