होम लोन पात्रता कॅल्क्युलेटर

होम लोन पात्रता ही तुमचे मासिक उत्पन्न, सध्याचे वय, क्रेडिट स्कोअर, ठराविक मासिक आर्थिक जबाबदारी, क्रेडिट रेकॉर्ड, निवृत्तीचे वय इ. घटकांवर अवलंबून असते. एच डी एफ सी होम लोन पात्रता कॅल्क्युलेटर वापरून तुमच्या लोनविषयी सर्व माहिती अगदी आरामात मिळवा

Calculate Home Loan Eligibility

₹. .
10 K ₹. 1 Cr
1 30
0 15
₹. .
₹. . 0 ₹. 1 Cr

तुमची होम लोन पात्रता

₹. .

अधिक निधी हवा आहे / काही मदतीची गरज आहे?

आमच्यासह चॅट करा

तुमचा होम लोन EMI असेल

₹. . /महिना

सामान्यत: ही कॅल्क्युलेटर केवळ स्वत:ची मदत व्हावी या हेतूने निर्माण केली आहेत. याचे परिणाम तुम्ही पुरविलेल्या गृहितकांसह अन्य काही घटकांवर अवलंबून असतात. आम्ही त्याची अचूकता किंवा तुमच्या परिस्थितीसाठी उपयुक्तता याची हमी देत नाही.
NRI ने निव्वळ उत्पन्नाचा तपशील द्यावा.

होम लोन पात्रतेची गणना कशी केली जाते??

हाऊसिंग लोन पात्रता सर्वप्रथम व्यक्तीच्या उत्पन्न आणि रिपेमेंट क्षमतेवर अवलंबून असते. वय, फायनान्शियल स्थिती, क्रेडिट हिस्ट्री, इतर फायनान्शियल जबाबदाऱ्या यासारखे होम लोनची पात्रता निर्धारित करणारे इतर घटक आहेत.

होम लोन पात्रता निकष

 1. वर्तमान वय आणि उर्वरित कामकाजाचे वर्ष: होम लोन पात्रता निर्धारित करण्यात अर्जदाराचे वय मोठी भूमिका बजावते. कमाल लोन कालावधी सामान्यपणे 30 वर्षांमध्ये मर्यादित आहे.
 2. वेतनधारी व्यक्तींसाठी वयमर्यादा: 21 ते 65 वर्षे .
 3. स्वयं-रोजगारित व्यक्तींसाठी वयमर्यादा: 21 ते 65 वर्षे.
 4. किमान वेतन: ₹10,000 p.m.
 5. किमान बिझनेस उत्पन्न: ₹2 लाख p.a.
 6. कमाल लोन कालावधी: 30 वर्षे.
 7. फायनान्शियल स्थिती: लोन रक्कम निर्धारित करण्यावर अर्जदाराच्या वर्तमान आणि भविष्यातील उत्पन्नाचा मोठा प्रभाव असतो.
 8. मागील आणि वर्तमान क्रेडिट हिस्ट्री आणि क्रेडिट स्कोअर : साफ रिपेमेंट रेकॉर्ड सकारात्मक मानला जातो.
 9. इतर फायनान्शियल जबाबदाऱ्या: सध्याचे देय जसे कार लोन, क्रेडिट कार्ड कर्ज, इ.

होम लोन पात्रता कशी वाढवावी?

होम लोन्स ची पात्रता याद्वारे वाढविली जाऊ शकते

 • कमावणाऱ्या कौटुंबिक सदस्याला सह-अर्जदार म्हणून जोडणे.
 • संरचित रिपेमेंट प्लॅन घेणे.
 • स्थिर उत्पन्न प्रवाह, नियमित सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट सुनिश्चित करणे.
 • तुमच्या नियमित अतिरिक्त उत्पन्न स्रोताचे तपशील देणे.
 • तुमच्या परिवर्तनीय वेतन घटकांचा रेकॉर्ड ठेवणे.
 • तुमच्या क्रेडिट स्कोअर मधील त्रुटी सुधारण्यासाठी (असल्यास) कृती करणे.
 • चालू लोनची परतफेड आणि शॉर्ट टर्म लोनची परतफेड

एच डी एफ सी च्या पात्रता कॅल्क्युलेटरचा वापर कसा करावा?

एच डी एफ सी चे पात्रता कॅल्क्युलेटर ऑनलाईन हाऊसिंग लोनची पात्रता तपासण्यासाठी सुविधा प्रदान करते.

 • एकूण उत्पन्न (मासिक) ₹ मध्ये: एकूण मासिक उत्पन्न एन्टर करा. एन आर आय ने निव्वळ उत्पन्न प्रविष्ट करावे.
 • लोन कालावधी (वर्षांमध्ये): इच्छित लोन कालावधी एन्टर करा, ज्यासाठी तुम्हाला लोन हवे आहे. दीर्घ कालावधीमुळे पात्रता वाढवण्यासाठी मदत होते.
 • इंटरेस्ट रेट (% p.a.): एच डी एफ सी चा सध्याचा हाऊसिंग लोन इंटरेस्ट रेट एन्टर करा. प्रचलित इंटरेस्ट रेट्स बद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
 • इतर EMI (मासिक): तुमच्या इतर लोन्स चे EMI एन्टर करा

कॅल्क्युलेटर वापरून तुम्हाला तुमची पात्रता आणि EMI रक्कम मिळाल्यानंतर, तुम्ही एच डी एफ सी द्वारे सहजपणे तुमच्या घरातून आरामात होम लोन साठी ऑनलाईन अप्लाय करू शकता.

एच डी एफ सी कडे ऑनलाईन होम लोन अप्लाय करण्यासाठी क्लिक करा

जर तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर कृपया तुमचा तपशील आमच्यासोबत शेअर करा. एच डी एफ सी तुम्हाला तुमचे स्वप्नातील घर ओळखण्यापूर्वीच प्री-ॲप्रूव्ह्ड होम लोन सुविधा प्रदान करते.

सामान्यत: ही कॅल्क्युलेटर केवळ स्वत:ची मदत व्हावी या हेतूने निर्माण केली आहेत. याचे परिणाम तुम्ही पुरविलेल्या गृहितकांसह अन्य काही घटकांवर अवलंबून असतात. आम्ही त्याची अचूकता किंवा तुमच्या परिस्थितीसाठी उपयुक्तता याची हमी देत नाही.

What Factors determine your home loan eligibility?

 • जेव्हा तुम्ही होम लोनसाठी अप्लाय करता, तेव्हा तुमची पात्रता मुख्यतः तुमच्या उत्पन्नावर आणि रिपेमेंट क्षमतेवर अवलंबून असते.
 • काही इतर घटक देखील आहेत जे तुमची होम लोन पात्रता निर्धारित करतात:
  • तुमचे वय, फायनान्शियल स्थिती, क्रेडिट हिस्ट्री, क्रेडिट स्कोर, इतर फायनान्शियल जबाबदाऱ्या इ.

More on How to Improve Home Loan Eligibility?

 • तुम्ही याद्वारे तुमची होम लोन पात्रता वाढवू शकता:
  • कमावणाऱ्या कौटुंबिक सदस्याला सह-अर्जदार म्हणून जोडणे.
  • संरचित रिपेमेंट प्लॅन घेणे.
  • स्थिर उत्पन्न प्रवाह, नियमित सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट सुनिश्चित करणे.
  • तुमच्या नियमित अतिरिक्त उत्पन्न स्रोताचे तपशील देणे.
  • तुमच्या परिवर्तनीय वेतन घटकांचा रेकॉर्ड ठेवणे.
  • तुमच्या क्रेडिट स्कोअर मधील त्रुटी सुधारण्यासाठी (असल्यास) कृती करणे.
  • चालू लोनची परतफेड आणि शॉर्ट टर्म लोनची परतफेड.

चला चॅट करूया!