होम लोन: होम लोन EMI कॅल्क्युलेटर - एच डी एफ सी होम लोन
होम लोन EMI कॅल्क्युलेटर
एच डी एफ सी चे होम लोन कॅल्क्युलेटर वापरून तुम्ही अगदी सहज तुमचे होम लोन EMI कॅल्क्युलेट करू शकता. होम लोनकरिताचे एच डी एफ सी चे EMI कॅल्क्युलेटर तुम्हाला नवीन घर खरेदी करतेवेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करते. तुमच्या होम लोनकरिता तुमचा कॅशफ्लो प्लॅनिंग करण्याकरिता EMI कॅल्क्युलेटर उपयुक्त आहे. एच डी एफ सी देऊ करीत आहे होम लोन ज्याच्या EMI ची सुरुवात ₹652 प्रति लाख आणि इंटरेस्ट रेट्स सुरुवात 6.80%* p.a. आहे, तसेच फ्लेक्सिबल रिपेमेंट पर्याय आणि टॉप-अप लोन सारखे अतिरिक्त फीचर्सही मिळतील. कमी इंटरेस्ट रेट आणि दीर्घ रिपेमेंट कालावधी यासह एच डी एफ सी तुम्हाला आरामदायी होम लोन EMI ची खात्री देते. आमच्या वाजवी EMIs सह एच डी एफ सी होम लोन तुमच्या खिशाला परवडणारे आहे. आमच्या सहज समजणाऱ्या होम लोन EMI कॅल्क्युलेटर सह तुमच्या होम लोन साठी तुम्हाला भरावे लागणारे EMI कॅल्क्युलेट करा.
होम लोन EMI कॅल्क्युलेट करा
होम लोन EMI कॅल्क्युलेटर म्हणजे काय?
होम लोन EMI कॅल्क्युलेटर लोन इंस्टॉलमेंटच्या कॅल्क्युलेशनमध्ये मदत करते उदा. तुमच्या होम लोनचा EMI. हे कॅल्क्युलेटर वापरण्यास सोपे आहे आणि घर खरेदी करणार्या व्यक्तीसाठी फायनान्शियल प्लॅनिंग टूल म्हणून काम करते.
होम लोन EMI म्हणजे काय?
EMI म्हणजे समान मासिक हप्ता. यामध्ये मुद्दल रकमेचे रिपेमेंट आणि तुमच्या होम लोनच्या थकित रकमेवरील इंटरेस्टचे पेमेंट यांचा समावेश होतो. दीर्घ लोन कालावधी (जास्तीत जास्त 30 वर्षांसाठी) EMI कमी करण्यास मदत करते.
घर खरेदीचे प्लॅनिंग करण्यात EMI गणना कशी मदत करते?
एच डी एफ सी चे होम लोन EMI कॅल्क्युलेटर EMIसाठी देय आवश्यक रकमेचा स्पष्ट अंदाज देतो आणि दरमहा होम लोन बद्दल निर्णय घेण्यास मदत करते. हे घेतलेल्या लोन रकमेचा अंदाज घेण्यास मदत करते आणि स्वतःचे किती योगदान असावे आणि प्रॉपर्टीची किंमत मोजण्यात मदत करते. त्यामुळे होम लोन पात्रता मोजण्यासाठी आणि तुमच्या घर खरेदीच्या प्रवासाचे प्लॅनिंग करण्यासाठी EMI जाणून घेणे महत्त्वपूर्ण आहे.
एच डी एफ सी होम लोन मुख्य लाभ आणि वैशिष्ट्ये काय आहेत?
-
मान्यताप्राप्त प्रकल्पांमध्ये खासगी विकासकांकडून एक फ्लॅट, रो हाउस, बंगला खरेदीसाठी होम लोन
-
DDA, MHADA इत्यादी डेव्हलपमेंट ऑथोरिटी कडून प्रॉपर्टी खरेदीसाठी होम लोन
-
सध्याच्या को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा अपार्टमेंट मालकांच्या संघटना किंवा डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या किंवा खासगीरित्या बांधल्या गेलेल्या घरांमध्ये प्रॉपर्टी खरेदीसाठी लोन
-
फ्रीहोल्ड / लीज होल्ड प्लॉट किंवा डेव्हलपमेंट ऑथोरिटी द्वारे वाटप केलेल्या प्लॉटवरील बांधकामासाठी लोन
-
योग्य घर खरेदी निर्णय घेण्यात तुमची मदत करण्यासाठी तज्ज्ञ कायदेशीर आणि तांत्रिक सल्लामसलत
-
भारतात कोठेही होम लोन मिळविण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी एकीकृत शाखांचे नेटवर्क
-
भारतीय लष्करात कार्यरत असलेल्यांसाठी होम लोनसाठी AGIF सह विशेष व्यवस्था.
आमचे खास होम लोन सर्व वयोगट आणि रोजगार श्रेणीच्या ग्राहकांसाठी आहेत. आम्ही ॲडजस्टेबल रेट पर्याय अंतर्गत, टेलिस्कोपिक रिपेमेंट पर्याय असलेले 30 वर्षांपर्यंतचे दीर्घ कालावधीचे लोन्स देतो, जे तरुण ग्राहकांचे आयुष्यात लवकरात लवकर स्वतःचे घराचे मालक बनण्याचे स्वप्न पूर्ण करते.
सुमारे 4 दशकांहून अधिक काळासाठी होम फायनान्स पुरविण्याच्या आमच्या प्रबळ अनुभवाच्या जोरावर आम्ही आमच्या ग्राहकांच्या विविध गरजा आणि स्वतःचे घर असावे हे स्वप्न पूर्ण व्हावे हे समजण्यास सक्षम आहोत .
एच डी एफ सी चे होम लोन EMI कॅल्क्युलेटर कसे वापरावे?
EMI काढण्यासाठी तुम्हाला केवळ खालील तपशील एन्टर करायचा आहे:
- लोन रक्कम: तुम्हाला हवी असलेली इच्छित लोन रक्कम एन्टर करा
- लोन कालावधी (वर्षांमध्ये): इच्छित लोन कालावधी एन्टर करा, ज्यासाठी तुम्हाला हाऊसिंग लोन हवे आहे. दीर्घ कालावधीमुळे पात्रता वाढवण्यासाठी मदत होते
- इंटरेस्ट रेट (% p.a.): इंटरेस्ट रेट एन्टर करा.
प्रचलित होम लोन इंटरेस्ट रेट्स जाणून घेण्यासाठी 'येथे क्लिक करा'
होम लोन अमॉर्टिझेशन शेड्यूल म्हणजे काय?
लोन अमॉर्टिझेशन ही लोन कालावधीसाठी नियमित पेमेंट्स सह लोन कमी करण्याची प्रोसेस आहे. होम लोन अमॉर्टिझेशन शेड्यूल हा रिपेमेंट रक्कम, मुख्य आणि इंटरेस्ट घटकांचा तपशील देणारा टेबल आहे.
एच डी एफ सी चे EMI कॅल्क्युलेटर लोन कालावधी आणि इंटरेस्ट रेट्स वर आधारित मुख्य रक्कम ते देय इंटरेस्ट यांच्या रेशिओविषयी उत्तम माहिती प्रदान करते. EMI कॅल्क्युलेटर रिपेमेंट शेड्यूल स्पष्ट करणारा अमॉर्टिझेशन टेबल देखील प्रदान करते. एच डी एफ सी चे होम लोन कॅल्क्युलेटर इंटरेस्ट आणि मुख्य रकमेचा संपूर्ण तपशील प्रदान करते.
एच डी एफ सी देऊ करीत आहे होम लोन पात्रता वाढविणारे विविध रिपेमेंट प्लॅन्स:
एच डी एफ सी विविध गरजा पूर्ण करण्यासाठी होम लोन पात्रता अधिक करण्यासाठी विविध रिपेमेंट प्लॅन्स ऑफर करते.
- स्टेप-अप रिपेमेंट फॅसिलिटी (SURF)
SURF एक पर्याय देतो जिथे रिपेमेंट शेड्यूल तुमच्या अपेक्षित उत्पन्न वाढीशी जोडलेले असते. प्रारंभिक वर्षांमध्ये तुम्ही अधिक लोनचा लाभ घेऊ शकता आणि कमी EMI भरू शकता. त्यानंतर, तुमच्या उत्पन्नातील गृहीत वाढी सह रिपेमेंट वाढत जाते.
- फ्लेक्सिबल लोन इंस्टॉलमेंट्स प्लॅन (FLIP)
FLIP तुमच्या रिपेमेंट क्षमतेस अनुरुप एक सानुकूलित उपाय देऊ करते जो लोनच्या मुदतीत बदलू शकतो. लोनची रचना अशा प्रकारे केली जाते की सुरुवातीच्या काळामध्ये EMI जास्त असते आणि नंतर उत्पन्नाच्या प्रमाणात ते घटते.
- ट्रांच आधारित EMI
जर तुम्ही बांधकाम सुरू असलेली प्रॉपर्टी खरेदी केल्यास तुम्हाला सामान्यतः लोनच्या अंतिम डिस्बर्समेंट पर्यंत काढलेल्या लोनच्या रकमेवर आधी इंटरेस्ट सर्व्हिस करावा लागतो आणि त्यानंतर EMI भरावे लागते. पण जर तुम्हाला मुद्दलाचे रिपेमेंट पण आधी करायचे असेल तर तुम्ही लोन रक्कम निवडण्याचा पर्याय घेऊ शकता आणि वितरित होणाऱ्या जमा झालेल्या रकमेवर EMI भरणे सुरू करू शकता.
- वाढीव रिपेमेंट स्कीम
हा पर्याय तुम्हाला तुमच्या उत्पन्नातील वाढीच्या प्रमाणात दरवर्षी EMI वाढवण्याची लवचिकता प्रदान करतो ज्यामुळे तुम्हाला लोन रिपेमेंट जलद करता येते.
- दूरदर्शी रिपेमेंट पर्याय
या पर्यायासह तुम्हाला 30 वर्षांपर्यंतचा अधिकचा रिपेमेंट कालावधी मिळतो. याचाच अर्थ वाढलेली लोन रक्कम पात्रता आणि कमी EMIs.
आमच्या वैशिष्ट्यपूर्ण EMI कॅल्क्युलेटरचा वापर करून तुमच्या हाऊसिंग लोनच्या EMI चा अंदाज घ्या!
कॅल्क्युलेटर वापरून EMI चा अंदाज घेतल्यानंतर, तुम्ही एच डी एफ सी द्वारे ऑनलाईन होम लोन सह सहजपणे तुमच्या घरातून आरामात होम लोन साठी अप्लाय करू शकता.
प्री-ॲप्रूव्ह्ड होम लोन म्हणजे काय?
एच डी एफ सी तुम्हाला तुमचे स्वप्नातील घर ओळखण्यापूर्वीच प्री-ॲप्रूव्ह्ड होम लोनची सुविधा प्रदान करते. प्री-ॲप्रूव्ह्ड होम लोन तुमचे उत्पन्न, पत व फायनान्शियल स्थितीवर आधारित लोन साठी इन-प्रिन्सिपल मंजुरी होय. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
एच डी एफ सी सह ऑनलाईन होम लोन करिता अप्लाय करा, क्लिक करा ऑनलाईन अप्लाय करा वर
जर तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर कृपया तुमचा तपशील आमच्यासोबत शेअर करा.
होम लोन्स विषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
होम लोन अमॉर्टिझेशन शेड्यूल
वर्ष | प्रारंभिक बॅलन्स | EMI*12 | वार्षिक दिलेला इंटरेस्ट | वार्षिक दिलेली मुद्दल | अंतिम बॅलन्स |
---|---|---|---|---|---|
1 | 25,00,000 | 2,29,002 | 1,68,126 | 60,876 | 24,39,124 |
2 | 24,39,124 | 2,29,002 | 1,63,855 | 65,147 | 23,73,977 |
3 | 23,73,977 | 2,29,002 | 1,59,284 | 69,718 | 23,04,259 |
4 | 23,04,259 | 2,29,002 | 1,54,393 | 74,609 | 22,29,650 |
5 | 22,29,650 | 2,29,002 | 1,49,158 | 79,844 | 21,49,807 |
6 | 21,49,807 | 2,29,002 | 1,43,556 | 85,445 | 20,64,361 |
7 | 20,64,361 | 2,29,002 | 1,37,562 | 91,440 | 19,72,921 |
8 | 19,72,921 | 2,29,002 | 1,31,146 | 97,856 | 18,75,065 |
9 | 18,75,065 | 2,29,002 | 1,24,281 | 1,04,721 | 17,70,344 |
10 | 17,70,344 | 2,29,002 | 1,16,933 | 1,12,069 | 16,58,275 |
11 | 16,58,275 | 2,29,002 | 1,09,071 | 1,19,931 | 15,38,344 |
12 | 15,38,344 | 2,29,002 | 1,00,656 | 1,28,346 | 14,09,999 |
13 | 14,09,999 | 2,29,002 | 91,652 | 1,37,350 | 12,72,648 |
14 | 12,72,648 | 2,29,002 | 82,015 | 1,46,987 | 11,25,662 |
15 | 11,25,662 | 2,29,002 | 71,703 | 1,57,299 | 9,68,362 |
16 | 9,68,362 | 2,29,002 | 60,666 | 1,68,335 | 8,00,027 |
17 | 8,00,027 | 2,29,002 | 48,856 | 1,80,146 | 6,19,881 |
18 | 6,19,881 | 2,29,002 | 36,217 | 1,92,785 | 4,27,096 |
19 | 4,27,096 | 2,29,002 | 22,691 | 2,06,311 | 2,20,785 |
20 | 2,20,785 | 2,29,002 | 8,217 | 2,20,785 | 0 |
होम लोन FAQs
EMI म्हणजे 'समान मासिक हप्ता', अशी रक्कम जी लोनची पूर्ण परतफेड होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट तारखेला तुमच्याद्वारे आम्हाला दिली जाईल. EMI मध्ये मूलभूत आणि इंटरेस्ट घटकांचा समावेश आहे, जो अशा प्रकारे संरचित केला जातो की तुमच्या लोनच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये इंटरेस्ट मुख्य घटकापेक्षा बराच जास्त असतो आणि लोनच्या उत्तरार्धाच्या तुलनेत मुख्य घटक जास्त असतो.
होम लोन्स हे विकासकाकडून बांधकाम असलेली किंवा तयार असलेली प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, रिसेल प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, जमिनीच्या प्लॉटवर हाऊसिंग युनिट बांधण्यासाठी, आधीच अस्तित्वात असलेल्या घरामध्ये सुधारणा आणि विस्तार करण्यासाठी आणि तुमचे विद्यमान होम लोन वित्तीय संस्थेमधून एच डी एफ सी कडे ट्रान्सफर करण्यासाठी घेतले जातात.
एच डी एफ सी होम लोन ऑनलाईन अप्लाय करण्याची सुविधा, जलद लोन प्रोसेसिंग, आकर्षक इंटरेस्ट रेट्स, कस्टमाईज्ड रिपेमेंट पर्याय आणि सोपे आणि त्रास-मुक्त डॉक्युमेंटेशन यासारखे अनेक लाभ प्रदान करते.
तुम्ही 4 जलद आणि सोप्या स्टेप्समध्ये एच डी एफ सी होम लोन ऑनलाईन प्राप्त करू शकता:
1. साईन-अप / रजिस्टर करा
2. डॉक्युमेंट्स अपलोड करा
3. प्रोसेसिंग फी देय करा
4. लोन मंजुरी मिळवा
आता तुम्ही होम लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. आत्ताच अप्लाय करण्यासाठी https://portal.hdfc.com/ ला भेट द्या!.
आम्ही मुख्यत्वे तुमच्या उत्पन्न आणि रिपेमेंट क्षमतेद्वारे तुमची होम लोन पात्रता ठरवतो. इतर महत्त्वाच्या घटकांमध्ये तुमचे वय, पात्रता, अवलंबून असलेल्यांची संख्या, तुमच्या पती/पत्नीचे उत्पन्न (जर असल्यास), मालमत्ता आणि दायित्व, सेव्हिंग्स रेकॉर्ड आणि व्यवसायाची स्थिरता आणि सातत्य यांचा समावेश होतो.
तुम्ही भविष्यात भारतात माघारी येण्याचे नियोजन करण्यासाठी, परदेशात काम करीत असताना सुद्धा होम लोन साठी अप्लाय करू शकता. जरी तुम्ही प्रॉपर्टी निवडली नसेल किंवा बांधकाम सुरू झाले नसेल तरीही एकदा तुमचे प्रॉपर्टी खरेदी करण्याचे किंवा बांधण्याचे ठरवल्यास तुम्ही कधीही अप्लाय करू शकता.
लोन डिस्बर्समेंट झालेल्या महिन्याच्या नंतरच्या महिन्यापासून EMI ला सुरुवात होते. अंडर-कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीच्या लोन बाबतीत, EMI सामान्यपणे संपूर्ण होम लोन डिस्बर्स झाल्यानंतर सुरू होतो मात्र कस्टमर त्यांना पहिले डिस्बर्समेंट प्राप्त झाल्यानंतर लगेचच त्यांचे EMI सुरू होणे निवडू शकतात आणि त्यांचे EMI प्रत्येक नंतरच्या डिस्बर्समेंटच्या प्रमाणानुसार वाढले जातील. रिसेल बाबतीत, संपूर्ण लोन रक्कम एकाच वेळी डिस्बर्स झाली असल्याने संपूर्ण रकमेवरील EMI डिस्बर्समेंट झालेल्या महिन्याच्या नंतरच्या महिन्यापासून सुरू होईल
आम्हाला डिस्बर्समेंट साठी तुमची विनंती मिळाल्यानंतर, आम्ही संपूर्णपणे किंवा हप्त्यामध्ये लोन डिस्बर्स करू, जे सामान्यत: तीनपेक्षा जास्त नसेल. निर्माणाधीन प्रॉपर्टी च्या बाबतीत, आम्ही तुमचे लोन बांधकामाच्या प्रगतीच्या आधारावर हप्त्यांमध्ये डिस्बर्स करू, तुमच्या सांगण्याप्रमाणे आणि विकासक करारानुसार आवश्यक नाही. तुम्हाला सल्ला दिला जातो की विकासकाशी करार करा, ज्यामध्ये देयके बांधकामाशी संबंधित असतील आणि वेळ-आधारित शेड्यूल वर पूर्व-परिभाषित नसतील.
तुम्हाला लोन रकमेनुसार “स्वतःचे योगदान” म्हणून एकूण प्रॉपर्टीच्या 10-25% पेमेंट करणे गरजेचे आहे. प्रॉपर्टी खर्चाच्या 75 ते 90% रक्कम होम लोन म्हणून प्राप्त करू शकतो. कन्स्ट्रक्शन, होम इम्प्रुव्हमेंट आणि होम एक्स्टेन्शन लोनच्या बाबतीत, कन्स्ट्रक्शन/ इम्प्रुव्हमेंट/ एक्स्टेन्शन खर्चाच्या 75 ते 90% रक्कम फंड केली जाऊ शकते.
साधारणतः खालील प्रकारची होम लोन उत्पादने हाऊसिंग फायनान्स संस्थांनी देऊ केली असतात: होम लोन्स: ही लोन्स याकरता:
1. मंजूर प्रकल्पांमध्ये खासगी विकासकांकडून फ्लॅट, रो हाउस, बंगल्याची खरेदी;
2.डीडीए, म्हाडा तसेच विद्यमान सहकारी हाऊसिंग संस्था, अपार्टमेंट मालकांचे असोसिएशन किंवा विकास प्राधिकरणांच्या वसाहती किंवा खासगीरित्या बांधकाम केलेली घरे अशा प्रॉपर्टी खरेदीसाठी होम लोन्स;
3.फ्रीहोल्ड / लीज होल्ड प्लॉट किंवा विकास प्राधिकरणाने आवंटित केलेल्या प्लॉटवर बांधकाम कर्जे
प्लॉट खरेदी लोन: प्रत्यक्ष वाटप किंवा पुनर्विक्री व्यवहाराद्वारे तसेच इतर बँक/फायनान्शियल संस्थांकडून मिळविलेले विद्यमान प्लॉट खरेदी लोन ट्रान्सफर करण्यासाठी प्लॉट खरेदी लोन घेण्यात येते.
बॅलन्स ट्रान्सफर लोन: इतर बॅंक / फायनान्शियल संस्थेकडून मिळालेले आपले थकित होम लोन एच डी एफ सी कडे ट्रान्सफर करणे याला बॅलन्स ट्रान्सफर लोन म्हणतात .
होम इम्प्रुव्हमेंट लोन: नूतनीकरण (संरचना / चटई क्षेत्र बदलल्याशिवाय) करण्यासाठी जसे टाईल्स, फ्लोअरिंग, अंतर्गत / बाह्य प्लास्टर आणि पेंटिंग इत्यादी अनेक कामांसाठी हे लोन आहे.
होम एक्सटेंशन लोन: अतिरिक्त रुम आणि फ्लोअर इ. बाबींसह तुमचे घर विस्तारित करण्यासाठी किंवा जागा वाढविण्यासाठी हे लोन उपयोगी आहे.
टॉप अप लोन्स: वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजांसाठी (जोखमीच्या उद्देशांव्यतिरिक्त) जसे विवाह, मुलांचे शिक्षण, बिझनेस विस्तार, लोन एकत्रीकरण इत्यादींसाठी जे लोन घेतल्या जाऊ शकते.
लोन अगेंस्ट प्रॉपर्टी (LAP): हे लोन पूर्ण बांधकाम झालेल्या, स्वतःच्या संपूर्ण मालकीच्या निवासी किंवा कमर्शियल प्रॉपर्टी वर खालील उपयोगांसाठी असते: वैयक्तिक आणि बिझनेस गरजा (जोखमीच्या उद्देशांव्यतिरिक्त) जसे विवाह, वैद्यकीय खर्च आणि मुलांचे शिक्षण इ. अन्य बॅंक आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमधून घेतलेले वर्तमान लोन अगेंस्ट प्रॉपर्टी (LAP) एच डी एफ सी मध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकते.
निर्माणाधीन असलेल्या प्रॉपर्टी करता बांधकामाच्या प्रगतीच्या आधारावर एच डी एफ सी लोन चे वाटप हप्त्यांमधे करते. वितरित केलेला प्रत्येक हप्ता 'आंशिक' किंवा 'त्यानंतरचे' डिस्बर्समेंट म्हणून ओळखले जाते.
होय, महिलांसाठी होम लोन व्याज दर इतरांना लागू असलेल्या दरापेक्षा कमी आहेत. इतरांना लागू असलेल्या होम लोन इंटरेस्ट रेट मधे सवलतीचा लाभ घेण्यासाठी महिलांना प्रॉपर्टी मधे मालक / सह मालक असणे, तसेच एच डी एफ सी होम लोन मधे अर्जदार / सह अर्जदार असणे आवश्यक आहे.
आपण पूर्व मंजूर होम लोन साठी अप्लाय करू शकता जी आपले उत्पन्न, क्रेडिट पात्रता आणि फायनान्शियल स्थितीच्या आधारे दिलेली लोन ची तत्त्वतः मंजुरी आहे. साधारणपणे, पूर्व मंजूर होम लोन्स प्रॉपर्टी निवडण्यापूर्वी घेतले जातात आणि लोन मंजूर होण्याच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या कालावधीसाठी वैध असतात.
तुमच्या सोयीसाठी, एच डी एफ सी ने होम लोनचे रिपेमेंट करण्यासाठी विविध पद्धती उपलब्ध करुन दिल्या आहेत. तुम्ही तुमच्या बँकरला ECS(इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीम) द्वारे हफ्त्याने भरण्यासाठी स्थायी निर्देश जारी करू शकता, तुमच्या नियोक्ताद्वारे मासिक हप्त्यांच्या थेट कपातीचा पर्याय निवडू शकता किंवा तुमच्या सॅलरी अकाउंटमधून पुढील तारखेचा चेक जारी करू शकता.
होम लोन सामान्यत: समान मासिक हप्ते (EMI) द्वारे भरले जाते. EMI मध्ये मूलभूत आणि व्याज घटकांचा समावेश असतो, ज्याची रचना तुमच्या लोनच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये व्याजाच्या घटक मुख्य घटकापेक्षा जास्त असते, तर लोनच्या उत्तरार्धाच्या दिशेने, मुख्य घटक खूपच मोठा असतो.