भारतात एच डी एफ सी होम लोन मिळविण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

एच डी एफ सी ची होम लोन ॲप्लिकेशन प्रोसेस सोपी आणि सोयीस्कर आहे. होम लोन ॲप्लिकेशन आणि वितरण प्रक्रियेसाठी क्रमवार मार्गदर्शिका येथे दिली आहे.

Step 1: Application of the Home Loan

तुम्ही ओळख पुरावा, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा इ. सारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांसह योग्यरित्या भरलेला अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जर तुम्ही सह-अर्जदारासह अर्ज करीत असाल तर तुम्ही सह-अर्जदाराच्या समान कागदपत्रांचा सेट सादर करणे आवश्यक आहे आणि त्यांनी देखील ॲप्लिकेशनवर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.

जर तुम्ही आधीच प्रॉपर्टी शॉर्ट-लिस्ट केली असेल तर तुम्हाला फॉर्ममध्ये तपशील प्रदान करावे लागेल आणि कायदेशीर आणि तांत्रिक मूल्यांकनासाठी प्रॉपर्टी संबंधित कागदपत्रांची फोटोकॉपी सादर करावी लागेल.

तुम्ही www.hdfc.com ला भेट देऊन एच डी एफ सी होम लोनसाठी ऑनलाईन देखील अप्लाय करू शकता. तुम्ही आम्हाला आमच्या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करू शकता आणि आमचा सल्लागार तुमच्या घरी भेट देईल आणि प्रोसेसमध्‍ये तुमची मदत करेल.

Step 2: Loan Approval

तुम्ही फॉर्म आणि कागदपत्रे सादर केल्यानंतर, मूल्यमापनाची प्रोसेस सुरू होते. आम्ही तुमचे उत्पन्न, दायित्व, क्रेडिट स्कोअर इ. संबंधित विशिष्ट माहितीवर आधारित तुमच्या पात्रतेचे मूल्यांकन करतो.

जर तुम्ही स्वयं-रोजगारित असाल, तर वरील माहितीसोबतच आम्ही व्यवसायाची शाश्वतता आणि रोख प्रवाहाची स्थिरता याचे देखील मूल्यांकन करतो.

या टप्प्यावर, आम्ही क्षेत्रीय पत तपासणी करतो, ज्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये दिलेली माहिती प्रमाणित करण्यासाठी आमचा प्रतिनिधी तुम्हाला कॉल करू शकतो किंवा तुमच्या घरी/कार्यालयाला भेट देऊ शकतो.

आमच्या मूल्यांकनावर आधारावर, आम्ही तुमची लोन पात्रता निर्धारित करू.

Step 3: Legal & Technical Verification

तुम्ही प्रॉपर्टी संबंधित कागदपत्रांची संबंधित प्रत सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये शीर्षक कागदपत्रांची संपूर्ण साखळी (पुनर्विक्री प्रॉपर्टीच्‍या बाबतीत), बिल्डरसह विक्री करार, एन ओ सी (ना-हरकत सर्टिफिकेट), ओ सी (व्यवसाय सर्टिफिकेट) आणि आम्हाला पडताळणी करण्यासाठी आवश्यक असलेले इतर कोणतेही कागदपत्र यांचा समावेश होतो. प्रॉपर्टीचे बांधकाम मंजूर योजना आणि इतर लागू मानदंडांनुसार झाले आहे की नाही हे तपासण्यासाठी आणि बाजार मूल्याचे मूल्यांकन करण्यासाठी आम्ही प्रॉपर्टीची तांत्रिक तपासणी देखील करू.

Step 4: Home Loan Sanction

तुमची लोन पात्रता निर्धारित केल्यानंतर आणि प्रॉपर्टीच्या कायदेशीर आणि तांत्रिक बाबींची पडताळणी केल्यानंतर, आम्ही मंजुरी पत्र द्वारे लोन रक्कम कळवू. मंजुरी पत्रामध्ये खालील तपशील समाविष्ट असेल:

  • एकूण मंजूर लोन रक्कम.
  • होम लोन इंटरेस्ट रेट
  • लागू इंटरेस्ट रेटचा प्रकार (फिक्स्ड किंवा फ्लोटिंग इंटरेस्ट रेट)
  • लोन कालावधी
  • देय EMI (लागू असल्याप्रमाणे)
  • मंजुरी पत्राची वैधता
  • डिस्बर्समेंट पूर्वी पूर्ण करावयाच्या विशेष अटी (जर असल्यास)
  • इतर अटी व शर्ती.

Step 5: Home Loan Disbursement

क्रेडिट, कायदेशीर आणि तांत्रिक पडताळणी केल्यानंतर, तुम्ही आम्हाला मूळ शीर्षक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. तुम्ही एकदा नमूद कागदपत्रे सादर केल्यावर आणि डिस्बर्समेंटची विनंती केल्यावर आम्ही तुमचा डिस्बर्समेंट चेक तयार करण्याची प्रक्रिया सुरू करू. तुम्हाला लेंडरने डिस्बर्समेंट चेक सुपूर्द करण्‍यापूर्वी लोन करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. तुम्ही लोन करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी इंटरेस्ट रेट, इंटरेस्ट प्रकार, लोनचा कालावधी, ई एम आय आणि इतर अटी व शर्ती यासारखे सर्वात महत्त्वाचे तपशील काळजीपूर्वक वाचले असल्याची खात्री करा.

जर तुम्ही खरेदी करू इच्छित असलेली प्रॉपर्टी बांधकामात असेल तर आम्ही बांधकामाच्या प्रगतीवर आधारित मंजूर रक्कम विकसकाला हप्त्यांमध्ये वितरित करू.