प्रधान मंत्री आवास योजना

Ministry of Housing and Urban Poverty Alleviation (MoHUPA) has introduced in June 2015, an interest subsidy scheme called Credit Linked Subsidy Scheme (CLSS) under Pradhan Mantri Awas Yojana (URBAN)-Housing for All, for purchase/ construction/ extension/ improvement of house to cater Economical Weaker Section(EWS)/Lower Income Group(LIG)/Middle Income Group (MIG), given the projected growth of urbanization & the consequent housing demands in India.

PMAY लाभ

PMAY अंतर्गत क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीममुळे होम लोन माफक ठरते. इंटरेस्टच्या घटकावर देण्यात येणाऱ्या सबसिडीमुळे होम लोनवरील कस्टमरचा भार कमी होतो. स्कीम अंतर्गत उपलब्ध होणारी सबसिडीची रक्कम मुख्यत्वे कस्टमरच्या उत्पन्नाची कॅटेगरी आणि ज्या प्रॉपर्टीकरिता फायनान्स केला जात आहे तिचा आकार यावर अवलंबून असते.

इन्कम कॅटेगरी नुसार लाभ खालीलप्रमाणे:

EWS/LIG कॅटेगरी:

LIG आणि EWS कॅटेगरीमध्ये वार्षिक घरगुती उत्पन्न ₹ 3 लाखांपेक्षा अधिक मात्र ₹ 6 लाखांपेक्षा कमी असणाऱ्यांचा समावेश होतो. आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागातील(EWS) आणि कमी उत्पन्न गट (LIG) यामधील लाभार्थी कमाल 6.5% इंटरेस्ट सबसिडी करिता प्राप्त असतील. बांधकाम केले जाणारे किंवा खरेदी केलेली युनिटचे कार्पेट क्षेत्र 60 स्क्वेअर मीटर(अंदाजित 645.83 स्क्वे फी) पेक्षा अधिक नसावे. इंटरेस्ट सबसिडी कमाल लोन रक्कम 6 लाख ₹ पर्यंत मर्यादित आहे.

मध्यम उत्पन्न गटाचा(MIG) समावेश करण्यासाठी योजनेचा विस्तार 2017 मध्ये करण्यात आला होता. ही योजना दोन भागात विभागण्यात आली होती. म्हणजेच. MIG 1 आणि MIG 2.

MIG 1 कॅटेगरी:

MIG 1 कॅटेगरीमध्ये ₹ 6 लाखांपेक्षा अधिक परंतू ₹ 12 लाखांपेक्षा कमी घरगुती वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांचा समावेश होतो. MIG 1 कॅटेगरीमध्ये समाविष्ट होणारे लाभार्थी किमान 4 % इंटरेस्ट सबसिडी करिता प्राप्त ठरतील. बांधकाम केले जाणारे किंवा खरेदी केलेल्या युनिटचे कार्पेट क्षेत्र 160 स्क्वेअर मीटर(अंदाजित 1,722.23 स्क्वे फी) पेक्षा अधिक नसावे. तथापि, ही सबसिडी ही कमाल लोन रक्कम ₹ 9 लाख पर्यंत 20 वर्षांच्या होम लोन कालावधीकरता मर्यादित आहे.

MIG 2 कॅटेगरी:

MIG 2 कॅटेगरीमध्ये ₹ 12 लाखांपेक्षा अधिक परंतू ₹ 18 लाखांपेक्षा कमी घरगुती वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांचा समावेश होतो. MIG-2 कॅटेगरीमध्ये समाविष्ट होणारे लाभार्थी किमान 3 % इंटरेस्ट सबसिडी करिता प्राप्त ठरतील. बांधकाम केले जाणारे किंवा खरेदी केलेल्या युनिटचे कार्पेट क्षेत्र 200 स्क्वेअर मीटर(अंदाजित 2,152.78 स्क्वे फी) पेक्षा अधिक नसावे. तथापि, ही सबसिडी ही कमाल लोन रक्कम ₹ 12 लाख पर्यंत 20 वर्षांच्या होम लोन कालावधीकरता मर्यादित आहे.

प्रधानमंत्री आवास योजना पात्रता

 1. लाभार्थी कुटुंबाने त्याच्या /तिच्या नावाने किंवा त्याच्या /तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावाने भारताच्या कोणत्याही भागात पक्का घर घेऊ नये.
 2. विवाहित जोडप्याच्या बाबतीत, दोघांपैकी एक किंवा संयुक्तपणे दोघेही एकाच सबसिडी साठी पात्र असतील.
 3. लाभार्थी कुटुंबाने भारत सरकारच्या कोणत्याही हाऊसिंग योजने अंतर्गत किंवा PMAY मध्ये कोणत्याही योजने अंतर्गत कोणतेही केंद्रीय सहाय्य मिळवलेले नसावे.
लाभार्थी

लाभार्थी कुटुंबात पती, पत्नी आणि अविवाहित मुलांचा समावेश असेल. (वैवाहिक स्टेटस चा विचार न करता कमाई करणारा प्रौढ सदस्य MIG श्रेणीत एक स्वतंत्र घर मानला जाऊ शकतो)

कव्हरेज:

जनगणना 2011 नुसार वैधानिक नगरे आणि शहरे अधिसूचित केल्या जातील, वैधानिक शहरानुसार प्लॅनिंग क्षेत्रासह.

PMAY योजनेचा तपशील

CLSS योजना प्रकार EWS आणि LIG MIG 1 ** MIG 2 **
पात्रता घरगुती उत्पन्न (₹) ₹6,00,000 पर्यंत ₹6,00,001 ते ₹12,00,000 ₹12,00,001 ते ₹18,00,000
कार्पेट एरिया -जास्तीत जास्त (वर्ग मीटर) 60 वर्ग मीटर 160 वर्ग मीटर 200 वर्ग मीटर
इंटरेस्ट सबसिडी (%) 6.5% 4.00% 3.00%
कमाल लोनवर गणना केलेली सबसिडी ₹ 6,00,000 ₹ 9,00,000 ₹ 12,00,000
लोनचा उद्देश खरेदी / स्वत: बांधकाम / विस्तार खरेदी / स्वत: बांधकाम खरेदी / स्वत: बांधकाम
योजनेची वैधता 31/03/2022 31/03/2020 31/03/2020
कमाल सबसिडी (₹) 2.67 लाख 2.35 लाख 2.30 लाख
महिला मालकी होय * अनिवार्य नाही अनिवार्य नाही

* बांधकाम / विस्तारासाठी महिला मालकी अनिवार्य नाही

*15.03.2018 तारखेच्या दुरुस्ती नुसार, कमाई करणारा प्रौढ सदस्य (वैवाहिक स्टेटस लक्षात न घेता) स्वतंत्र कुटुंब मानला जाऊ शकतो. परंतु विवाहित जोडप्याच्या बाबतीत, दोघांपैकी एक किंवा संयुक्तपणे दोघेही एकाच घरासाठी पात्र असतील, योजने अंतर्गत कुटुंबातील उत्पन्न पात्रता लक्षात घेता.

**MIG साठी - 1 आणि 2 लोन 1-1-2017 ला / किंवा त्यानंतर मंजूर केले गेले पाहिजे

 1. MIG श्रेणीसाठी लाभार्थी कुटुंबाचा आधार क्रमांक आवश्यक आहे.
 2. इंटरेस्ट सबसिडी जास्तीत जास्त 20 वर्षे लोन कालावधीसाठी किंवा जे कमी असेल त्या लोन कालावधीसाठी उपलब्ध असेल.
 3. इंटरेस्ट सबसिडी एच डी एफ सी द्वारे लाभार्थ्यांच्या लोन अकाउंट मध्ये जमा केली जाईल, परिणामी प्रभावी हाऊसिंग लोन आणि समान मासिक हप्ते (EMI) कमी होतील.
 4. इंटरेस्ट सबसिडी च्या निव्वळ वर्तमान मूल्य (NPV) ची गणना 9% ची सूट देऊन केली जाईल.
 5. अनुदानित दर नसल्यास, विशिष्ट मर्यादेपेक्षा अतिरिक्त लोन.
 6. लोन रक्कम किंवा प्रॉपर्टी किंमतीवर कॅप नाही.

*योजनेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी कृपया www.mhupa.gov.in वर भेट द्या

टीपः CLSSचे फायदे मिळविण्यासाठी आपल्या पात्रतेचे मूल्यांकन भारत सरकारच्या विवेकबुद्धीनुसार होईल. येथील मजकूर पात्रता मूल्यांकनासाठी योजने अंतर्गत दर्शविला आहे.

 

क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम (CLSS) अंतर्गत कोण PMAY सबसिडी घेऊ शकतो?(CLSS)?

भारतातील कोणत्याही भागामध्ये घर नसलेले लाभार्थी कुटुंब या सबसिडी साठी पात्र आहे, कुटुंबासाठी परिभाषित केलेल्या उत्पन्न मापदंडाच्या अधीन.

लाभार्थी कुटुंबाची व्याख्या काय आहे?

लाभार्थी कुटुंबात पती, पत्नी आणि अविवाहित मुलांचा समावेश असेल. (वैवाहिक स्टेटस चा विचार न करता कमाई करणारा प्रौढ सदस्य MIG श्रेणीत एक स्वतंत्र घर मानला जाऊ शकतो)

EWS, LIG आणि MIG श्रेणी साठी उत्पन्न नियम काय आहेत?

कृपया उपरोक्त स्कीम तपशील पाहा.

हे ग्रामीण भागातील प्रॉपर्टी साठी लागू आहे का?

नाही.

PMAY सबसिडी साठी पात्र होण्यासाठी महिला मालकी अनिवार्य आहे का?

EWS आणि LIG साठी महिला मालकी किंवा सह-मालकी अनिवार्य आहे. तथापि, स्वत: बांधकाम / विस्तार किंवा MIG श्रेणी साठी ही अट अनिवार्य नाही.

इंटरेस्ट सबसिडी क्लेम करण्याची प्रोसेस काय आहे?

लोन वितरीत झाल्यानंतर, आवश्यक तपशील एच डी एफ सी द्वारे NHB कडे डाटा प्रमाणीकरणासाठी आणि इतर तपासणीसाठी पाठविले जातात. आवश्यक काम केल्यानंतर NHB पात्र कर्जदारांना सबसिडी मंजूर करते.

मला इंटरेस्ट सबसिडी लाभ कसा मिळेल?

 1. लोन वितरीत झाल्यानंतर, एच डी एफ सी नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) कडून पात्र कर्जदारांसाठी सबसिडी क्लेम करेल.
 2. योग्य तपासणीनंतर NHB सर्व पात्र कर्जदारांसाठी सबसिडी ची रक्कम एच डी एफ सी ला मंजूर करुन क्रेडिट करेल.
 3. सबसिडी ची गणना NPV (निव्वळ वर्तमान मूल्य) पद्धतीने 9% सवलत देऊन केली जाईल.
 4. NHB कडून सबसिडी रक्कम मिळाल्यानंतर, ती कर्जदाराच्या संबंधित होम लोन अकाउंट मध्ये जमा केली जाईल आणि त्यानुसार EMI कमी केला जाईल.

जेव्हा PMAY सबसिडी वितरित केली जाते, परंतु काही कारणास्तव घराचे बांधकाम थांबविले जाते तेव्हा काय होते?

अशा परिस्थितीत, केंद्र सरकारला सबसिडी ची परतफेड करून आणि परत पाठविली जाते.

लाभार्थी कुटुंबास 20 वर्षांच्या पुढे लोन मुदत मिळू शकते का?

होय, लाभार्थी एच डी एफ सी क्रेडिट मानदंडांनुसार 20 वर्षांपेक्षा जास्त दीर्घ कालावधी लोन चा लाभ घेऊ शकतात, परंतु सबसिडी कमाल20 वर्षांपर्यंत मर्यादित असेल.

लोन रक्कम किंवा प्रॉपर्टी किंमत यावर काही लिमिट आहे का??

नाही, परंतु सबसिडी प्रत्येक श्रेणी साठी परिभाषित लोन रकमेपर्यंत मर्यादित असेल आणि अतिरिक्त रक्कम गैर-अनुदानित इंटरेस्ट रेट वर असेल.

जर मी माझे होम लोन अन्य लेंडर कडे ट्रान्सफर केले, तर इंटरेस्ट सबसिडी कसे काम करेल?

जर एखाद्या कर्जदाराने हाऊसिंग लोन घेतले असेल आणि या योजनेच्या अंतर्गत इंटरेस्ट सबसिडी मिळविली असेल, परंतु नंतर दुसऱ्या लेंडिंग संस्थेत बॅलन्स ट्रान्सफर केले असेल तर असा लाभार्थी पुन्हा या योजनेचा क्लेम करण्यासाठी पात्र असणार नाही.

क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम (CLSS) साठी मी कुठे अप्लाय करू?

आपण एच डी एफ सी शाखांमध्ये CLSS अंतर्गत हाऊसिंग लोन साठी अप्लाय करू शकता.

PMAY सबसिडी चा लाभ घेण्यासाठी मला अतिरिक्त डॉक्युमेंट द्यावे लागतील का?

नाही, एच डी एफ सी ऑफिसेस मध्ये उपलब्ध असलेल्या स्वरूपात पक्का घराचे मालक नसल्याच्या स्वत:च्या घोषणा पत्रा शिवाय अतिरिक्त कोणतीही कागदपत्रे नाहीत.

NRI ला PMAY सबसिडी मिळू शकते का?

होय.

चला चॅट करूया!